यावल – येथील राहणाऱ्या व नाशिक येथे कामानिमित गेलेल्या एका तरूणाने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडती असुन या तरुणाच्या आत्महत्याचे वृत्त कळताच सुतारवाडा परिसरात व शहरात एकच खळबळ उडाली आहे.
कृष्णा अढळकर या तरूणाने आत्महत्या केल्याच्या घटनेचे वृत्त कळताच तात्काळ मयताचे कुटुंब हे नाशिककडे रवाना झाले आहे. या संदर्भात मिळालेली माहीती अशी यावल शहरातील सुतार वाडयातील राहणारे कृष्णा रामानंद अढळकर वय २७ वर्ष हा तरूण मागील १२ वर्षापासुन अंबड जिल्हा नाशिक येथे औद्योगीक वसाहतीमध्ये एका खाजगी फर्नीचरच्या कंपनीत कामास होता.
कृष्णा अढळकर हा त्या ठीकाणी एकटाच राहात होता त्यांने अंबड शहरातील राहत असलेल्या घरात गळफास घेवुन आत्महत्या करून घेतल्याचे त्याच्या शेजाऱ्यांकडुन यावल येथे त्याच्या कुटंबास कळाले. मयत तरुण हा अविवाहीत होता त्यांने आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप कळु शकले नाहीत. कृष्णा अढळकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर विभागाचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांचे चुलत बांधव होते .