अमळनेर प्रतिनिधी । जलसंपदामंत्री जयंत पाटील जिल्हा दौऱ्यावर येत असून ते अमळनेर मतदारसंघाला भेट देणार आहेत. संवाद यात्रेच्या निमित्ताने ते मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी हितगूज साधणार आहेत.
गुरुवारी सकाळी शिरपुर येथून पाडळसरे येथे येतील दुपारी निम्न तापी प्रकल्प भेट, त्यानंतर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत दुपारी बैठक , छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दुपारी अमळनेर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक व परिसंवाद असे त्यांच्या या दौऱ्याचे नियोजन आहे. आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानीही ते जाणार आहेत त्यानंतर अमळनेर येथून पारोळ्याकडे प्रयाण.करणार आहेत
दुपारी 3 वाजात पारोळा येथे पोहचल्यानंतर एरंडोल विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक घेणार आहेत . दुपारी सव्वा चार वाजता पारोळा येथून पाचोराकडे प्रयाण करतील . सायंकाळी पाचोरा विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक.घेतील त्यानंतर जामनेरकडे प्रयाण करतील , रात्री ८ वाजता जामनेर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक.घेतील ही बैठा आटोपून जळगाव येथे मुक्काम करतील .
परिसंवाद कार्यक्रमात सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे सेल फ्रंटल आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष सचिन पाटील, कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, शिवाजीराव पाटील, रणजित पाटील, शहराध्यक्ष बाळू पाटील, राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील, निवृत्ती बागुल, विनोद जाधव, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा सरचिटणीस कविता पवार, तालुकाध्यक्षा योजना पाटील, शहराध्यक्षा आशा चावरीया, आशा शिंदे, भावना देसले, भारती शिंदे, अलका गोसावी, अनिता भालेराव आदी कार्यकर्त्यांनी केले आहे.