थिम्पू वृत्तसंस्था : भूतानमध्ये मंगळवारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. भुतानच्या दामचू-हा या रस्त्यावर बांधकाम सुरू असलेला एक पूल अचानक कोसळला. या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला. अद्याप ६ जण बेपत्ता आहेत. रॉयल भूतान आर्मी आणि स्थानिक प्रशासन मदतकार्यात गुंतले आहे. बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरू आहे.
या पुलाचे काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ऑफ भूतान करत होते. पुलाचे काम लवकरच पूर्ण होणार होते. पण अचानक पूल कोसळला. भूतानचे पंतप्रधान डॉक्टर लोटे टीशरिंग यांनी अधिकृत हँडलवरुन ट्वीट करुन दुर्घटनेची माहिती दिली. मंगळवारी दिवसाचा समारोप एका दुर्दैवी बातमीने झाला.
भूतानच्या दामचू-हा रस्त्यावरील वांगचू पूल कोसळला. या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाला तर काही जण बेपत्ता झाले. बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू आहे, असे भूतानचे पंतप्रधान डॉक्टर लोटे टीशरिंग यांनी अधिकृत हँडलवरुन ट्वीट केले.
लागोपाठच्या दिवसांत भारतीय उपखंडात दुर्घटना झाल्या. भूतानमध्ये मंगळवारी अचानक बांधकाम सुरू असलेला एक पूल कोसळला. याआधी भारतात सोमवारी ८ फेब्रुवारी जम्मू काश्मीरमध्ये ३.५ रिश्टर क्षमतेचा भूकंपा झाला. तसेच उत्तराखंडमध्ये रविवारी ७ फेब्रुवारी रोजी चमोली जिल्ह्यात मोठा हिमकडा नदीत कोसळला.
हिमकडा कोसळल्यामुळे ऋषीगंगा खोऱ्यातील अलकनंदा आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याची पातळी एकदम वाढली आणि पाणी वेगाने पुढे सरकू लागले. पाण्याच्या मोठ्या प्रवाहात सापडल्यामुळे शेकडो नागरिक वाहून गेले.
Day ends with unfortunate news of the Wangchu bridge collapse at Damchu-Haa road today. Saying prayers for the lives lost and hoping
we find all missing persons safe and sound. My thoughts are with DANTAK team led by Chief Engineer Brigadier Kabir Kashyap and all rescue workers.— PM Bhutan (@PMBhutan) February 9, 2021