राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण राज्यभर संवाद यात्रा सुरू आहे.पक्षाची प्रतिमा ग्रामीण स्तरापर्यंत पोहोचविणे आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते यांचा पक्ष असल्याची जनभावना निर्माण करण्याचा प्रयत्न या यात्रेतुन असणार आहे.’राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा’ निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्दक्ष जयंत पाटील, महिला प्रदेशाध्दक्ष रूपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी युवा ब्रिगेड संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. जळगाव जिल्ह्यात ही 11 व 12 फेब्रुवारी ला संवाद यात्रा येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण आरोप प्रत्यारोपाने ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील असलेली मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करीत भाजपासुध्दा अंगावर घेणे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी सुरू केले आहे.
जिल्ह्यातील जुन्या नव्या कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये संवाद घडविण्याचे काम सुरूच आहे त्यातच आता संवाद यात्रेतुन या मोहीमेला आणखी मजबूती येणार असे म्हणणे संयुक्तिक होईल. जिल्ह्यातील पक्षाला आलेली मरगळ झटकून पक्षात नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न केला जात आहे तसे भासविले जात असताना प्रत्यक्षात उणी दुणी आहे यावरही प्रदेशाध्दक्ष यांच्यासमोर संवाद घडविला जावु शकतो. नुकत्याच माजी आमदार मनिष जैन यांचा वाढदिवस ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत साजरा झाला. यावरून एकनाथराव खडसे यांनी जुने विसरून राजकीय नवा घरोबा चांगलाच सांभाळा असल्याचे दिसते. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना पक्षवाढीचा दिलेला शब्द पुर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीत फुंकर घालण्याचे काम सुरू केले आहे.
राष्ट्रवादीच्या नवचैतन्यासाठी एकनाथराव खडसेंनी भाजला थेट अंगावर घेणे सुरू केले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन पुन्हा येईन’ म्हटलेल्या कवितेच्या ओळी म्हणत त्यांची खिल्ली उडविली फडणविसांनीही त्यांना उत्तर दिले. जळगावातील बैठक ओटोपून मुक्ताईनगर येथे झालेल्या बैठकीत भाजपाचे बेटी बचाओ बेटी पढाओ चे संयोजक डॉ. राजेंद्र फडके यांच्यावर त्यांच्या वडीलांचे नाव घेत टिका केली. भाजपाच्या विज बील दरवाढीच्या आंदोलनाला भाजपाची दुप्पटीपणाची टिका केली; यावरून खडसे भाजपाला घेरण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसते. जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेवरून खडसे अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. त्यातच संवाद यात्रेतुन पक्षाला बळकटी देण्यासाठी इतर पक्षातील कार्यकर्ते यांना पक्षात प्रवेश दिला जात आहे. जिल्ह्यात ही जयंत पाटलांच्या उपस्थितीत खडसे समर्थकसुध्दा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील असा कयास लावला जात आहे.
यामुळे जिल्ह्यासह राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञ यांचे संवाद यात्रेवर लक्ष लागून आहे. संवाद यात्रेची धास्ती भाजपाने घेतली असावी त्यासाठीच अमित शहा राज्यात येण्यापूर्वी विज बील वरून आंदोलन छेडण्यात आले. मात्र पेट्रोल, डिझेल, गॕस सिलेंडर दरवाढीवर भाजपाचे नेते मौन बाळगून आहे. भाजपातील ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी इंधन दरवाढीबाबत स्पष्टच प्रतिक्रिया देत दिलासा न देता हात वर केल्याने भाजपाची आणखी कोंडी झाल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात येणाऱ्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेतून राजकीय गणिते बदलतात काय या प्रश्नाचे उत्तर आगामी काळात घडणाऱ्या राजकीय घडामोडींबद्दल कळेलच मात्र जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लागावी इतकीच जनभावना आहे.
नाजनीन शेख
संपादक
दिव्य जळगाव