शिरसोली (अशोक पाटील) – तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथील राहणाऱ्या 50 वर्षीय इसम कुणालाही काही न सांगता घरातून निघून गेला होता. त्या इसमाचा आज सायंकाळच्या सुमारास गावातील सांडपाणी असलेल्या नाल्यात मृतदेह आढळून आल्याची घटना घडली.
शिरसोली प्र. बो. येथे राहणाऱ्या बंडु लक्ष्मण बुंधे (वय 50) हे गेल्या सात दिवसापासून कुणालाही काही न सांगता घरातून गेले होते. त्यांची हरवल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस स्थानकात नोंदविण्यात आली होती.
आज सायंकाळीच्या सुमारास त्यांचा मुत्युदेह गावातील सांडपाणी असलेल्या नाल्यात आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली होती. सदर इसमाची ओळख पटल्याने मुत्युदेह जळगांव जिल्हा सामान्य रूण्यालयात पाठविण्यात आला आहे.