जळगाव प्रतिनिधी । मुंबई येथील जे.जे. रूग्णालयात उपचार सुरू असतांना पत्रकार संतोष ढिवरे यांचे आज दुपारी निधन झाले. संतोष ढिवरे यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून मुंबई येथील जे. जे. रूग्णालयात उपचार सुरू होते.
उपचार सुरू असतांनाच आज दुपारी चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव रात्री उशीरा जळगावात आणले जाणार असून येथेच अंत्यसंस्कार होणार आहेत. संतोष ढिवरे यांच्या निधनाने जळगावच्या पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.