यावल (रविंद्र आढाळे) – नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रीक निवडणुकीत अतिशय चुरशीच्या झालेल्या लढतींमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य शिवरामशेठ तायडे यांच्या पॅनलने १५ पैकी १३ जागांवर दणदणीत विजय मिळवुन निवडून येत विरोधकांचा धुव्वा ऊडाला आहे.
शिवराम तायडे यांच्या पॅनलच्या विरोधात सर्वपक्षीय विरोधक एकत्र येऊन सुद्धा शेठ यांच्या पॅनलचा झालेला एकतर्फी विजय हा यंदाच्या निवडणुकीत तायडे त्यांच्या घराण्याचे पुनश्च वर्चस्व सिद्ध करणारा ठरली आहे .
या निवडणुकीत शिवरामशेठ तायडे यांच्यासह घरातील तीन सदस्य निवडून आले आहेत त्यात ते स्वतःव त्यांचा नातू आणि सून हे आहेत. माजी पंचायत समितीचे सभापती व भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष डॉ.नरेंद्र कोल्हे यांच्या पत्नी आणि सून तसेच विद्यमान उपसरपंच दिलीप भालेराव, उपसा जलसिंचन चेअरमन दिनकर भंगाळे या दिग्गज उमेदवार या निवडणुकीत पराभूत झालेले आहेत. शिवरामशेठ यांच्या विरोधात विरोधकांनी मोठी खेळी करत मतविभाजन करण्यासाठी ५उमेदवार दिले होते.
पण ८० वर्षाच्या वयात सुद्धा त्यांनी विरोधकांचे सगळे डाव चितपट करत चुरशीच्या लढतीत स्वतःची विजयश्री खेचून आणली आणी बामणोद ग्रामपंचायतीवर पुनश्च शिवराम तायडे व काँग्रेसने आपले वर्चस्व आबाधीत राखले आहे .
तिसरी पिढी सरपंचपदी विराजमान होणार
या निवडणुकीच्या निकालानंतर आणि आरक्षण सोडत नंतर शिवरामशेठ यांचे नातू राहुल(गिरीश) विलास तायडे हे सरपंचपदी विराजमान होणार हे निश्चित आहे.यापूर्वी शिवरामशेठ यांनी व त्यांच्या सून नथाबाई कैलास तायडे यांनी सरपंचपद भूषविले आहे