Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शेअर बाजारात तेजी; निर्देशांकाने 51 हजाराचा टप्पा ओलांडला

by Divya Jalgaon Team
February 5, 2021
in राष्ट्रीय
0
सेन्सेक्सने वेग वाढविला, 360 गुणांची नोंद झाली

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात चांगली तेजी दिसत आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराने 51 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजारातही तेजी आहे. तसेच बँक निफ्टीने 36 हजाराचा टप्पा पार केला आहे. हा आतापर्यंतचा विक्रम आहे.

कामकाजाच्या सुरुवातीला मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 417 अंकांची वाढ होत बाजार 51,031.39 वर सुरू झाला. तर निफ्टीमध्ये 57 अंकांची वाढ होत 14,952.60 वर सुरू झाला. अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात तेजी दिसत असून दररोज निर्देशांकात विक्रमी वाढ होत आहे.

सध्या बँकिग क्षेत्राच्या शेअरमध्ये तेजी दिसत आहे. एसबीआयच्या शेअरमध्ये विक्रमी वाढ होत आहे. त्यामुळे बँक निफ्टीमध्येही विक्रमी वाढ झाली आहे. शुक्रवारी बँक निफ्टीने 36 हजाराचा टप्पा पार केला आहे. हा आतापर्यंतचा विक्रम आहे.

आरबीआयने शुक्रवारी व्याजदर जाहीर केले. व्याजदरात कोणतेही बदल करण्यात आले नसल्याने बँकेचे शेअर आणखी वधारतील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अर्थसंकल्पात बँकिक क्षेत्राच्या सुधारणेसाठी उचलण्यात आलेल्या निर्णयांना बाजाराचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच दोन बँकांच्या खासगीकरणाच्या निर्णयानेही बँकिंग क्षेत्राच्या शेअरमध्ये वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

अर्थसंकल्प सोमवारी सादर झाल्यानंतर शेअर बाजारात तेजी आहे. गुरुवारी बाजारात चढउतार होत होती. मात्र, दुपारनंतर बाजारात पुन्हा तेजी आली. गुरुवारी बाजार बंद झाला तेव्हा 358.54 अंकांची वाढ होत 50,614.29 वर कारभार सुरू होता. तसेच मुंबई शेअर बाजाराचे कॅपिटलायजेशन (सर्व शेअरचे मूल्य) 200 लाख कोटींवर पोहचले आहे.

मुंबई शेअर बाजाराने शुक्रवारी 51,073.27 अंकाचा उच्चांक नोंदवला आहे. तर निफ्टीने 15,014.65 अंकाचा उच्चांक नोंदवला आहे. बँक निफ्टीने 36,615.20 अंकाचा उच्चांक नोंदवला आहे. बाजारात शुक्रवारी एसबीआय, कोटक बँक, बँक ऑफ बडोदा, आयटीसी,टाटा स्टील, एमटीपीसीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.

Share post
Tags: Marathi NewsNew DelhiShare marketशेअर बाजारात तेजी; निर्देशांकाने 51 हजाराचा टप्पा ओलांडला
Previous Post

मौलाना आझाद महामंडळाला विविध समस्यांचे निवारण करा

Next Post

राज्यात एमआयडीसी देणार दहा ठिकाणी ईएसआय रुग्णालयांसाठी भूखंड

Next Post
ईएसआय रुग्णालयां

राज्यात एमआयडीसी देणार दहा ठिकाणी ईएसआय रुग्णालयांसाठी भूखंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group