Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत 37 (3) कलम लागू

by Divya Jalgaon Team
February 5, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
नव्याने दाखल होणाऱ्या बंद्यांसाठी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात तात्पुरते कारागृह

जळगाव – सध्या कोरोना विषाणुच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 28 फेब्रुवारी, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) लागू करण्यात आले आहे.

या कालावधीत शस्त्र, सोटे, भाले, तलवार, बंदुका, सुरे, लाठया व काठया किंवा शारीरिक दुखपती करण्यासाठी वापरात येतील, अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तु घेऊन फिरणे, अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा द्रव्ये बरोबर घेऊन फिरणे, दगड अगर इ. अस्त्रे किंवा शस्त्रे सोडावयाची अगर फेकावयाची हत्यारे, साधने इ. तयार, जमा करणे, आणि बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्रांचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्रांचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, सार्वजनिकरित्या ओरडणे किंवा विक्षिप्तपणे हावभाव करणे, सभ्यता अगर नितीमत्ता विरुध्द असतील अशी किंवा शांतता धोक्यात आणतील अशी भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे आणि तशी चिन्हे, चित्रे, फलक लावणे किंवा इतर कोणतेही असे जिन्नस अगर वस्तु तयार करणे अगर त्यांचा प्रसार करणे या कृत्यांना बंदी घालीत आहे.
वरील कलम 37 (1) अंतर्गतचा हा आदेश ज्यांना हातात लाठी किंवा तत्सम वस्तु घेतल्याशिवाय चालता येत नाही अशा वृध्द अथवा अपंग इसमांना लागु असणार नाही. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या कार्यालयाची पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share post
Tags: JalgaonMarathi Newsजिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत 37 (3) कलम लागू
Previous Post

राज्यात एमआयडीसी देणार दहा ठिकाणी ईएसआय रुग्णालयांसाठी भूखंड

Next Post

जिल्ह्यातील विविध गावांतील अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी 18 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Next Post
जिल्ह्यातील विविध गावांतील अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी 18 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील विविध गावांतील अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी 18 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group