धरणगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रथम आमदार हरीभाऊ आत्माराम महाजन यांचे काल रात्री अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हरीभाऊ आत्माराम महाजन यांचे रात्री एक वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी चार वाजता धरणगावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हरीभाऊ आत्माराम महाजन हे १९९०च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन एरंडोल विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. ते जिल्ह्यातील शिवसेनेचे पहिले आमदार होते. नंतर मात्र छगन भुजबळ यांच्यासह त्यांनी पक्षाची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या मृत्यूमुळे धरणगावसह परिसरावर शोककळा पसरली असून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे.