Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरीची संधी, पात्रता काय आणि कसा कराल अर्ज? वाचा

by Divya Jalgaon Team
February 2, 2021
in राष्ट्रीय
0
रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरीची संधी, पात्रता काय आणि कसा कराल अर्ज? वाचा

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअरपदासाठी सरकारी नोकरभरती निघाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. रिर्झव्ह बँकेने ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हील) आणि ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) विभागात एकूण ४८ जागांसाठी भरती केली जाणार आहे.

रिझर्व्ह बँकेने आज नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली असून इच्छुक उमेदवारांना बँकेच्या rbi.org.in या अधिकृत वेबसाइटवर यासंबंधिची सर्व माहिती जाणून घेता येणार आहे. ऑनलाइन फॉर्मच्या माध्यमातून इच्छुकांना आपला अर्ज दाखल करता येईल. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासूनच सुरू होणार आहे आणि उमेदवारांना १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.

पात्रता काय?

आरबीआयच्या ज्युनिअर इंजिनिअर भरतीच्या जाहिरातीनुसार उमेदवारानं देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं असावं. याशिवाय, इलेक्ट्रीकल किंवा सिव्हील विभागातून डिल्पोमा विभागातून कमीतकमी ६५ टक्के गुण आणि डीग्री परीक्षेत कमीतकमी ५५ टक्के गुणांनी उत्तीर्ण होणं अपेक्षित आहे. यासोबतच संबंधित कामासाठी उमेदवारांना कमीत कमी दोन वर्षांचा अनुभव असणं देखील गरजेचं असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. उमेदवारांचं वय १ फेब्रुवारी २०२१ पर्यंत २० वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा अधिक नसावं, अशीही अट आरबीआयने घातलेली आहे. पण एससी, एसटी, ओबीसी आणि अन्य प्रवर्गातील उमेदवारांना यातून सूट देण्यात आली आहे.

सुरक्षा गार्ड आणि ग्रेड बी ऑफीसर पदासाठीही भरती

आरबीआयकडू याआधीच तब्बल २४१ पदांसाठी सुरक्षा गार्डच्या पदासाठीही भरती निघाली आहे. तर ग्रेड बी ऑफीसर पदासाठी ३२२ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठीची ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया याआधीच सुरू देखील झाली आहे. सुरक्षा गार्डसाठीची अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम तारीख १२ फेब्रुवारी आहे. तर ग्रेड बी ऑफीसर पदासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.

Share post
Tags: Marathi NewsNew Delhiपात्रता काय आणि कसा कराल अर्ज? वाचारिझर्व्ह बँकेमध्ये नोकरीची संधी
Previous Post

दहावी पाससाठी सरकारी नोकरीची मोठी संधी

Next Post

किसान मोर्चाची घोषणा : देशभरात 6 फेब्रुवारीला शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन

Next Post
किसान मोर्चाची घोषणा : देशभरात 6 फेब्रुवारीला शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन

किसान मोर्चाची घोषणा : देशभरात 6 फेब्रुवारीला शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group