जळगाव – कोविडच्या काळात व्यवसायाची परिभाषा बदलली असून आताच्या ऑनलाईन काळात बिजनेस अनॅलिसिस फार महत्वाचे झाले आहे. तसेच फक्त बिजनेस अनॅलिसिस हे काही एमबीए किंवा बीबीएच्या विध्यार्थ्यांपुरताच मर्यादित नसून ते इंजिनिअरिंग किंवा इतर शाखेतील विद्यार्थ्यांसाठीही महत्वपूर्ण झाले आहे.
तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने सोल्युशन नावाचे तंत्र आत्मसात केले पाहिजे कारण प्रत्येकाला विविध काळात विविध समस्यांना सामोरे जावे लागते यावेळी प्रत्येक समस्येवर उपाय असलाच हवा असे प्रतिपादन रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या बिजनेस सिम्युलेशन लॅबच्या ऑनलाईन उदघाट्नाप्रसंगी ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनचे संचालक निरज कपूर यांनी व्यक्त केले.
भारतातल्या आयएम्स, हेदराबाद येथील आयएसबी, मोहाली येथील आयएसबी यासारख्या मोठमोठ्या इस्टिट्युट मध्ये बिजनेस सिम्युलेशन या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्रात फक्त रायसोनी इस्टीट्यूट सोबत असणाऱ्या बिजनेस सिम्युलेशन लॅबचे रायसोनी महाविध्यालयाने तीनशे लायसन्स घेतलेले असून प्रॅक्टिकली उद्योगधंदे कसे चालतात त्यांचे अनुभव विध्यार्थ्यांना या लॅबच्या माध्यमातून मिळणार आहे.
जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटने नुकतीच ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन सोबत बिजनेस सिम्युलेशन लॅबची संकल्पना आपल्या इस्टीट्यूटमध्ये सुरु केली असून इस्टीट्यूटमधील सर्व विध्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम सक्तीचा करण्यात आला आहे. सदर ऑनलाईन उदघाट्नाप्रसंगी ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनचे उपसंचालक रवी जांगरा व रायसोनी इस्टिट्युट च्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल उपस्थित होत्या.
प्रा. डॉ. अग्रवाल यांनी रायसोनी इस्टीट्युट सदैव दर्जात्मक शिक्षण देण्यास आग्रही असते, बिजनेस सिम्युलेशन लॅबची संकल्पना ही “लर्निग थ्रू फन अॅड गेम” या पद्धतीची असल्याने विध्यार्थ्यांना नक्कीच या लॅबचा फायदा होणार आहे. नॅशनल एज्युकेशन पॅालिसीचा ही हाच मुद्धा आहे की, विध्यार्थ्यांना थेरी बेस एज्युकेशन न देता प्रॅक्टिकल एज्युकेशन द्यावे तसेच अभ्यासक्रमातील मॅनेजमेंट,स्टॅटेजी,फायनान्स,एचआर हे फक्त थेरीमध्ये विध्यार्थ्यांना शिकवून त्यांच्या लक्षात येत नसल्याने या अभ्यासक्रमातील बारकावे तसेच प्रॅक्टिकल ज्ञान बिजनेस सिम्युलेशन लॅबमधील गेमच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना हे हाताळता येणार आहे.
या लॅबमध्ये विध्यार्थ्यांना बिजनेस कसा चालवायचा, आयपीओ व शेअर हे मार्केटमध्ये कसे लॅाच करायचे, ऑपरेशनला किती पैसे द्यायचे, आपल्या प्रॉडक्टची किमंत किती ठरवली पाहिजे, किमंत कशी कमी केली पाहिजे या सर्व बाबी बिजनेस सिम्युलेशन लॅबमध्ये विध्यार्थ्यांना प्रॅक्टिकली शिकता येणार आहे. यावेळी प्रा. राहुल त्रिवेदी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर एमबीए विभागाचे डीन प्रा. मकरंद वाठ यानी कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले तसेच संचालक प्रितम रायसोनी, प्रा. रफिक शेख, प्रा. राज कांकरिया, प्रा. तन्मय भाले व आदी प्राध्यापक तसेच बहुसंख्य विध्यार्थी बिजनेस सिम्युलेशन लॅबच्या ऑनलाईन उदघाट्न कार्यक्रमात सहभागी झाले होते.