नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ पोहचत आहे. मात्र या दरवाढी दरम्यान तुम्हाला एक दिलासा देणारी ऑफर देण्यात येत आहे. या खास ऑफरमध्ये गॅस सिलेंडरसाठी तुम्हाला जी रक्कम लागेल ती परत केली जाईल. मोबाइल वॉलेट प्लॅटफॉर्म पेटीएमने ही ऑफर ग्राहकांना दिली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना पेटीएमद्वारे एकदाच गॅस सिलिंडर बुक करावा लागणार आहे. मात्र या ऑफरचा आज शेवटचा दिवस असणार आहे. 31 जानेवारी आधी जर तुम्ही एलपीजी सिलेंडर बुक केला तर थेट मोफत हा तुमच्यापर्यंत डिलिव्हर केला जाईल.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ऑफर फक्त त्याच ग्राहकांना मिळणार आहे जे पहिल्यांना पेटीएमधून गॅस सिलिंडर बुक करत आहेत. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला मोबाइलमध्ये पेटीएम डाऊनलोड करावं लागेल. यानंतर तुम्ही पेटीएमवरून एलपीजी गॅस सिलिंडर बुक करुन या ऑफरचा लाभ घेऊ शकता. यामध्ये सिलेंडरचे सगळे पैसे तुम्हाला कॅशबॅकमध्ये परत मिळतील. यामध्ये तुम्हाला 700 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. हा फायदा पेटीएमकडून पहिल्यांदाच गॅस सिलिंडर बुकिंगवर उपलब्ध आहे.
पेटीएमकडून 700 रुपयांच्या कॅशबॅक मिळवण्यासाठी संपूर्ण प्रोसेस पुढीलप्रमाणे करा फोनमध्ये पेटीएम डाउनलोड करा, त्यानंतर ‘recharge and pay bills’ वर जा, आता ‘book a cylinder’ पर्याय उघडा, भारत गॅस, एचपी गॅस किंवा इंडेनमधून तुमचा गॅस निवडा, नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा तुमचा एलपीजी आयडी भरा, यानंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय दिसेल, आता देय देण्यापूर्वी ‘FIRSTLPG’ प्रोमो कोड ऑफरमध्ये भरा. त्याचबरोबर या ऑफर चा लाभ घेण्यासाठी तुमची बुकिंगची रक्कम 500 रुपये किंवा त्याहून अधिक असेल तरच पेटीएम ऑफरचा लाभ घेता येणार आहे. ही ऑफर फक्त 31 जानेवारीपर्यंत लागू करण्यात आली आहे. तुम्ही बील दिल्यावर एक स्क्रॅच कूपन मिळेल. बुकिंगच्या 24 तासात हे कूपन मिळेल. हे कूपन 7 दिवसांच्या आत उघडा. यानंतर तुमच्या खात्यात कॅशबॅक येईल.