जळगाव प्रतिनिधी । घर बांधण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये आणावे यासाठी विवाहीतेचा छळ होत असल्याचा गुन्हा तालूका पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला आहे.
सावखेडा (ता.जळगाव) शिवारातील शिवबा नगरातील चोविस वर्षीय विवाहीता प्रतिभा रामनंदन पाल यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे, पिडीतेचा विवाह भांडूप(मुंबई) येलि रामानंद गिरधारी पाल यांच्या सोबत (वर्ष२०१९) मध्ये झाला आहे. लग्नानंतर चार-पाच महिन्यांनी पती व सासरच्या मंडळींनी विवाहीतेच छळण्यास सुरवात केली. घर बांधण्यासाठी माहेरुन १ लाख रुपये आणावे यासाठी पती रामानंद पाल, नणंद-किरण पाल, सुमन पाल, नंदलाल गिरधारी पाल अशा चौघा विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास पेलिस नाईक उमेश ठाकरे करत आहेत.