Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

वेबसाइटवर मृत्यू कसा होतो असं पाहून १३ वर्षाच्या मुलाने घेतला गळफास

by Divya Jalgaon Team
January 27, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
वेबसाइटवर मृत्यू कसा होतो असं पाहून १३ वर्षाच्या मुलाने घेतला गळफास

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील तुकाराम वाडीमध्ये आपल्या मामाकडे राहणाऱ्या १३ वर्षाच्या मुलाने मोबाईलमध्ये वेबसाईटवर मृत्यू कसा होतो असं पाहून मुलाने बाथरूममध्ये जाऊन गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

मयत झालेल्या मुलाचे नाव हर्षल ऊर्फ सोन्या दीपक कुंवर (वय १३) रा शिंदखेडा ता. धुळे असे आहे. हर्षल हा आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने तीन ते चार महिन्यांपासून हर्षल ऊर्फ सोन्या हा तुकाराम वाडीतील त्याचे मामा दिपक भदाणे यांच्याकडे आलेला होता. मामा दिपक यांचा कपडे इस्त्रीचा व्यवसाय आहे. आज मामा दिपक कामानिमित्ताने घराबाहेर होते तर हर्षल व त्याची आजी प्रमिलाबाई हे दोघेच घरी होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास आजी कामानिमित्ताने दुकानवर गेली. दुकानावरून परत आल्यावर बाथरूममध्ये हर्षल हा साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळुन आला.तुकाराम वाडीतील ग्रामस्थांसह नातेवाईकांनी मृतदेह तातडीने सुरुवातीला खाजगी रुग्णालयात यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविला.

या ठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे तसेच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले.  पंचनामा करुन शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षल याच्याकडे मोबाइल होता. या मोबाईलमध्ये त्याने डेथ इन ऑकर-ई वेबसाइट ओपन करून याठिकाणी मृत्यू कधी होणार म्हणून स्वतःची जन्मतारीख टाकलेली असल्याचे दिसून आले.

तसेच यानंतरही त्याने यू ट्यूबसह अनेक वेबसाइट ओपन केल्याचे दिसून आले. मोबाईलमध्ये वेबसाइट बघितल्यानंतर आजी काही वेळासाठी बाहेर जाताच हर्षलने मोबाइलमध्ये बघितल्याप्रमाणे बाथरूममध्ये जाऊन गळफास घेतला. यात त्याचा मृत्यू झाला आहे.

Share post
Tags: crimeJalgaonMarathi NewsSuicideवेबसाइटवर मृत्यू कसा होतो असं पाहून १३ वर्षाच्या मुलाने घेतला गळफास
Previous Post

Share Market : सेन्सेक्स घसरला, 217 अंक खुले

Next Post

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, नेहरू युवा केंद्राच्यावतीने 21 रक्तदात्याने केले रक्तदान

Next Post
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, नेहरू युवा केंद्राच्यावतीने 21 रक्तदात्याने केले रक्तदान

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, नेहरू युवा केंद्राच्यावतीने 21 रक्तदात्याने केले रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group