यावल (रविंद्र आढाळे) – येथील एका स्वस्त धान्य दुकानात अज्ञात चोरटयांनी दुकानातील धान्य चोरून नेल्याची घटना घडली असुन याबाबत दुकानदारांने पोलीसात तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल शहरातील म्हसोबा परिसरातील मेन रोडला असलेली यावल सहकारी ग्राहक भंडार दुकान क्रमांक१o८ यांच्याव्दारे संचलीत स्वस्त धान्य दुकानात दिनांक २५ जानेवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरटयांनी दुकानाचे कुलुप तोडुन आत प्रवेश करून सर्वसामान्य लाभार्थी नागरीकांच्या वितरणासाठी ठेवलेल्या धान्यातील पाच क्विटंल गहु अडीच क्विटंल मका असे भरडधान्य शासकीय किमत सुमारे चार हजार रुपये तर बाजार भाव किमत अंदाजीत१०हजार रुपये किमतीचे गहु तर सुमारे ३ हजार रुपये किमतीचा मका असे साहीत्य चोरीस गेले असुन , याबाबत दुकान संचालक केशव प्रल्हाद बढे यांनी यावल पोलीस तक्रार दाखल केल्याने अज्ञात चोरटयांच्या विरूद्ध चोरीचा गुन्हा नोदंविण्यात आला असुन , तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस करीत आहे .