जळगाव – जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील सरपंचासह ग्रामस्थांनी आज प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषदेच्या इमारतीसमोर सकाळपासून आमरण उपोषण सुरु केले असून त्या गावातीलच राकेश पाटील नामक व्यक्ती विकास कामांमध्ये अडथळा आणत असतो त्याचा विरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणीसाठी सरपंचासह ग्रामस्थ यांचे आमरण उपोषण करण्यात आले.
राकेश पाटील नावाचा व्यक्ती वारंवार अर्जफाटे करून शासनाला चुकीची माहिती देऊन दिशाभूल करतोअसतो तसेच ग्रामपंचायतीच्या दप्तराची छेडछाड ही करतो, असा आरोप करत उपोषण करणाऱ्या ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
दरम्यान, राकेश पाटील याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर जिल्हा परिषदेच्या समोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. सरपंच हर्षदा पाटील, ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील, अन्नपूर्णा पाटील यांच्यासह मनोहर पाटील, राजेंद्र पाटील, प्रभाकर पाटील आदींची उपस्थिती होती.