जळगाव प्रतिनिधी । जळगावातील भादली गावातील शेतमजूर महिलांना घरी घेऊन जात असतांना ट्रॅक्टर उलटल्याने अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात एक ठार तर १५ जण गंभीर जखमी झाल्याची बातमी आहे.
जळगावातील भादलीजवळ ट्रॅक्टर उलटल्याने अपघात
जळगाव तालुक्यातील भादली गावात शेतमजूर महिलांना घेऊन ट्रॅक्टर गावाकडे येत होता. तितक्यात ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाले. या अपघातात एक महिला ठार झाली आहे, व १५ महिला जखमी झाल्याचे समजते. या अपघात जखमींपैकी काही महिलांची प्रकृती गंभीर जखमी असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भिती आहे. या अपघाताचे वृत्त मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना जळगावला पाठविण्यात आले आहे.


