जळगाव प्रतिनिधी । शहरातील शाहू नगर परिसरात असणार्या जळकी मिलजवळ रात्री आठच्या सुमारास एका तरूणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली होती. त्या तरूणाचा जुन्या वादातून खून झाल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.
जळगाव शहरातील शाहू नगर भागातील जळकी मिलजवळ रात्री ८ वाजेच्या सुमारास एका तरूणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली होती. त्याच्या अंगावर जखमा असल्याने त्याचा घातपाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत होता. मृत तरूणाचे नाव अल्तमश शेख शकील (वय २२) असून तो मिस्तरी काम करत होता. या तरूणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता अल्तमश हा एका गुन्ह्यात आठ दिवसांपूर्वीच जामीनावर सुटून आल्याची माहिती मिळाली.
यामुळे त्याच्यावर पूर्व वैमनस्यातून हल्ला करण्यात आल्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशीरापर्यंत या चौघांची चौकशी सुरू होते. तसेच उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.