जळगाव प्रतिनिधी । बीएचआर घोटाळ्याप्रकरणी शिवाजीनगर पुणे येथे दाखल गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात सूरज झंवर याचा सहभाग निष्पन्न झाला होता. बीएचारआर घोटाळ्याप्रकरणी पुणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या सुरज सुनील झंवर यास पुणे न्यायालयाने 2 फेब्रुवारीपर्यंत 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पथकाने 22 जानेवारी रोजी सूरज झंवर यास त्याच्या जळगाव शहरातील जयनगर येथील राहत्या घरुन अटक केली. याबाबत रामानंदनगर पोलिसात नोंद करण्यात येवून सूरज झंवर यास घेवून पथक पुणे येथे रवाना झाले होते. त्यास शनिवारी पुणे येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्या. एस.एस. गोसावी यांनी त्यास 2 फेब्रुवारीपर्यंत 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


