नाशिक | नाशिक महापालिकेमधील शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयाला आग लागली आहे. महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांच्या कार्यालयाला ही आग लागल्याची माहिती आहे.
अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेले असून ते आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत.
सध्यातरी आगीच्या कारणाचा प्राथमिक अंदाज सांगता येणार नाही. नंतर आगीच्या कारणाची सविस्तर चौकशी करु, असं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.