भडगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात चोरीचे प्रमाणात वाढ होत आहे. तालुक्यातील अंजनविहिरी व आमडदे येथे भर दिवसा घरफोडी होऊन एकूण सात तोळे सोने व ९० हजार रूपयांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पोबारा केल्याचे उघडकीस आले आहे.
तालुक्यातील अंजनविहीरे येथिल रहिवाशी संजय जुलाल पाटील हे पत्नी अरुणाबाई व मुलगा योगेश सह स्वतःच्या शेतात कामासाठी गेले होते. घरी कोणीच नसल्याचा फायदा उचलत चोरट्यानी घरातील कपाटात ठेवलेले साडेतेरा ग्राम सोन्याची मंगलपोत, १० ग्रम नेकलेस, ७ ग्राम टोगल, ५ ग्रम काप, ५ ग्रम, ६ ग्रम व ३ ग्रम असे तीन अंगठ्या, ३ ग्रम पिंपळपान व १६ हजार रुपये रोख असा सर्व ऐवज चोरुन नेला. ही घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली. संजय पाटील यांचा मुलगा योगेश दुपारी घरी असलेल्या गुराना पाणी पाजण्यासाठी घरी आला असता ही घटना उघडकीस आली. चोरट्यानी घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडुन घरात प्रवेश करत पुढील व मागिल घरात असलेले कपाटातुन दागदागिने शोधत साहित्य अस्ताव्यस्त फेकुन ऐवज लंपास केलेला दिसुन आला.
संजय पाटील यांच्या कडे मागिल महिन्यात मुलाचे लग्न झाले होते. त्यामुळे मुलगा, नवविवाहीत सुनबाई व पत्नीचे घरातील कपाटात ठेवलेले दागदागिने चोरट्यानी लंपास केल्याने पाटील कुटुंब खुपच हादरले आहे. याबाबत त्यांनी पोलीस स्टेशन येवुन चोरीच्या घटनेची माहीती दिली. दुसरी घरफोडीची घटना आमडदे येथे घडली. आमडदे येथे रहिवाशी अनिल साहेबराव पाटील हे वाहनचालक असून ते गाडी घेवुन बाहेर गावी गेले होता. त्याची पत्नी मनिषा अनिल पाटील या शेतात मजुरी साठी गेले असता घराचे कुलुप तोडुन कपाटात ठेवलेले १० ग्रम सोने व कापुस विकुन आलेले ७४ हजार रुपये रोख असा मुद्देमाल घेवुन चोरटे पसार झाले. मनिषा पाटील या सायंकाळी पाच वाजता शेतातुन घरी आल्या असता चोरीची घटना उघडकीस आली. घरफोडीच्या दोन्ही घटनेतील चोरटे हे काळ्या रंगाच्या पल्सर मोटर सायकलवर आले होते. असे सांगण्यात येत आहे.
घटनेचा तपास करण्यासाठी जळगाव येथुन श्वान व ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. अंजनविहीरे व आमडदे येथे दोन्ही ठिकाणी श्वानने घराच्या जवळपासच्या परीसरापर्यत माग दाखविला. रात्री उशिरा पर्यत घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती. या दोन्ही घटनांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर, पोलीस उप निरीक्षक अंनत पठारे, पोलीस नाईक लक्ष्मण पाटील, हवालदार भगवान बडगुजर, कॉन्स्टेबल ईश्वर पाटील करीत आहेत.