ऑस्ट्रेलिया मिशन फत्ते केल्यानंतर आता हिंदुस्थानी संघ इंग्लंडशी मायदेशात दोन हात करणार आहे. 5 फेब्रुवारीपासून दोन देशांमध्ये चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन देशांमध्ये चेन्नईमध्ये होणाऱ्या पहिल्या दोन कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. विराट कोहली, इशांत शर्मा व हार्दिक पांडय़ाचे संघात कमबॅक झाले आहे.
हिंदुस्थानी संघ खालीलप्रमाणे –
विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा, मयांक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), लोकेश राहुल, हार्दिक पांडय़ा, रिषभ पंत (यष्टिरक्षक), रिद्धीमान साहा (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दूल ठापूर