जळगाव – ज्येष्ठ पत्रकार अशोक भाटिया यानां जिल्हा माहिती अधिकारी बोडके यांच्या हस्ते अधिस्वीकृती पत्रिका देण्यात आली. यावेळी जि.मा.का.चे माजी कर्मचारी सुरेश सानप, श्री सोनवणे, अरुण नेवे, जमनादास भाटिया ज्येष्ठ पत्रकार ,रितेश भाटिया, सारंग भाटिया, दिपक भाटिया,ज्योती भाटिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
ज्येष्ठ पत्रकार अशोक भाटिया कार्यवाहक विश्वस्त मंडळ जळगाव जिल्हा पत्रकार संघ यानां सन 2012 पासुन ज्येष्ठ पत्रकार म्हणुन अधिस्वीकृती पत्रिका माहिती व जनसंपर्क विभागाने मंजूर केली होती. या महीन्यात मंत्रालयातून माहिती व जनसंपर्क विभाग मुम्बई यांच्या कडून नुतनीकरण होवुन अधिस्वीकृती पत्रिका जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांचे कडे आली होती. ती पत्रिका (अक्रिडेशन कार्ड) आज दि.18 जानेवारी सोमवार रोजी संध्याकाळी 7 वाजता अशोक भाटिया यांच्या निवास स्थानी स्वतः जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यानी सन्मानाने दिली.