जामनेर प्रतिनिधी । सध्या अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन सुरू असून या अनुषंगाने श्रीराम मंदिर निधी समर्पण कार्यालयातर्फे निधी संकलन अभियानास येथे प्रारंभ करण्यात आला. अयोध्या येथे उभारण्यात येणार्या भव्य श्रीराम मंदिरासाठी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन व त्यांच्या सौभाग्यवती साधना महाजन यांनी साडेपाच लाख रूपयांची देणगी प्रदान केली आहे.
सध्या अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन सुरू असून या अनुषंगाने श्रीराम मंदिर निधी समर्पण कार्यालयातर्फे निधी संकलन अभियानास येथे प्रारंभ करण्यात आला. यासाठी आमदार गिरीश महाजन व नगराध्यक्षा साधना महाजन यांनी साडेपाच लाखांचा निधी देऊन प्रारंभ केला.
आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी श्रीराम मंदिर अयोध्या निधी समर्पण अभियानास हा निधी प्रदान करण्यात आला. यात आमदार महाजन यांनी ५ लाख १ हजार १११ रुपये तर नगराध्यक्षा साधना महाजन यांनी ५१ हजारांचा धनादेश तालुका अभियान प्रमुखांकडे सुपूर्द केला. या प्रसंगी संघ कार्यवाह नीलेश माळी, विहिंपचे प्रखंड मंत्री प्रवीण सुशीर, सह अभियान प्रमुख गजानन माळी, श्याम मुळे, सदानंद देशपांडे, सुखदेव महाजन, केदार ओक, गजानन लोणारी, किशोर झांबरे, गोपाल बुळे, नाना सातवे, कर्ण बारी, आकाश नेमाडे, दीपक तायडे, सदानंद माळी, आशुतोष पाटील, गुंजन लोढा, राहुल माळी, छगन झाल्टे, जालमसिंग राजपूत आदी उपस्थित होते.