Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने दोन गटाच्या वादातून चाकू हल्ला

by Divya Jalgaon Team
January 15, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावात दुचाकींसह दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात

जामनेर प्रतिनिधी । आज सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक आहे. तालुक्यातील देवपिंप्री येथे दोन गटात वाद झाल्याची घटना घडली. देवपिंप्री येथे चाकू हल्ला झाला असून तेथे एका तरुणाने पिस्तूल काढून रोखून धमकी दिल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु आहे.

आज शुक्रवारी ग्रामपंचायींच्या निवडणुका होत आहेत. या अनुषंगाने गुरूवारी रात्री जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथे दोन गटांमध्ये वाद झाला. यात एका गटाने पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यानुसार तालुक्यातील देवपिंप्री ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारावरून गुरूवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास वाद उद्भवला. यातून तलवार व चाकूहल्ला झाला असून दोन जण जखमी झाले. यात परस्परांविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या आहेत. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मतदानाच्या पूर्वसंध्येला झालेल्या प्रकारामुळे निवडणुकीला गालबोट लागले.

भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम निकम यांच्यासह सहकार्‍यांविरूध्द जामनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यात म्हटले आहे की, यमुनाबाई सपकाळे या देवपिंप्री ग्रामपंचायतीसाठी वार्ड क्रमांक ४ मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा भाऊ नितीन प्रकाश सोनवणे हा देवपिंप्री फाट्यावर एकटा बसून लोकांशी मोबाईलवरून संपर्क करत होता. यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम निकम यांनी सुरेश शिंदे, चंद्रशेखर शिंदे, पप्पू शिंदे, त्यांचे दोन शालक, अमृत शिंदे, नितीन पाटील यांचेसह समर्थकांना घेऊन फाट्यावर आले. त्या ठिकाणी निकम यांनी शाब्दीक वाद घातला तर समर्थकांनी चाकूहल्ला केला. तर एकाने पिस्तूल काढून धाक दाखवला. यात नितीन प्रकाश सोनवणे हा जखमी झाला आहे. त्याने याबाबत पोलीसात तक्रार दिली असून या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. तर, तुकाराम निकम यांनी सुध्दा तक्रार दिली आहे. यानुसार त्यांचे समर्थक नितीन विकास पाटील यांच्यावर गावातच चाकूने हल्ला करण्यात आला आहे. यामुळे नितीन सोनवणे यांनी डोक्याला मारून घेतले असून ते आमच्यावर हल्ला झाल्याचा बनाव करत असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.

Share post
Tags: crimeJalgaonJamnerMarathi Newsग्रामपंचायत निवडणुकीच्या दोन गटाच्या वादातून चाकू हल्ला
Previous Post

जिल्हा भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांप्रकरणी आ. राजूमामा भोळेंची तक्रार

Next Post

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे ईडी कार्यालयात दाखल

Next Post
राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसेंनी मुक्ताईनगरमध्ये उडवला भाजपचा धुव्वा

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे ईडी कार्यालयात दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group