यावल ( रविंद्र आढाळे) – येथील भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी ए .टी .चौधरी यांची तर फिरोज तडवी यांची निवड आज संपन्न झालेल्या बैठकीत करण्यात आली करण्यात आहे .
यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाची बैठक संस्थापक अध्यक्ष अय्युब पटेल यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रदेश सविव जिवन चौधरी , प्रदेश संघटक सुनिल गावडे यांच्यासह सुनिल पिंजारी ,शब्बीर खान , बाळासाहेब आढाळे , चंद्रकांत सोनवणे ,सुधाकर धनगर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक १३ जानेवारी २०२१ रोजी ११ वाजता पत्रकार संघाची बैठक संपन्न झाली बैठकीत पत्रकारांच्या विविध समस्या व अडचणींच्या विषया संदर्भात यात यावल तालुका नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली असून तालुका अध्यक्षपदी ए .टी . चौधरी यांची तर उपाध्यक्षपदी फिरोज तडवी यांची व तालुका संघटकपदी विक्की वानखेडे , सहसचिवपदी रविद्र आढाळे सहसंघटकपदी दिपक नेवे यांची निवड करण्यात आली आहे . संघाच्या नुतन पदधिकारी यांचे स्वागत करण्यात आले .