जळगाव प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केट परिसरातून दुचाकीची लंपास केल्याची घटना ९ जानेवारी सकाळच्या सुमारास घडली. प्रकरणी शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गाडी मालक वाजिद शे. रफिक (वय-३२) रा. मासुमवाडी जळगाव यांचे शहरातील गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल रिपेअरींगचे दुकान आहे. ९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ते दुकानावर दुचाकी (एमएच १९ एझेड ८४०३) ने आले. दुकानसमोरील पार्किंगच्या ठिकाणी दुचाकी पार्क करून लावली. दुपारी २ वाजेच्या सुमारास दुचाकी जागेवर दिसून आली नाही.
परिसरातील इतरत्र भाग पिंजून काढला मात्र दुचाकी मिळून आली नाही. वाजिद शेख यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भास्कर ठाकरे करीत आहे.