जळगाव – महाराष्ट्र शासनाचा सामाजिक वनीकरण विभागाचा राष्ट्रीय हरित सेनेत केलेल्या पर्यावरण विषयक उपक्रमाची दखल घेत भाऊसाहेब राऊत विद्यालयाचे हरितसेना शिक्षक राजेश गोविंद जाधव, खूबचंद सागरमल विद्यालयाचे प्रविण वसंतराव पाटील व जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे किशोर माधवराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा सामाजिक वनीकरण विभागाचा आदर्श पर्यावरण शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार मिळालाबद्दल सार्वजनिक पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी त्यांचा सन्मान केला. सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी डॉ.एस.आय.शेख, सहायक वन सरंक्षक आर.एस.दसरे राष्ट्रीय हरित सेनेचे अशासकीय सदस्य सुनिल वाणी, भाऊसाहेब राऊत विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.एस.तायडे,खूबचंद सागरमल विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश साळुंखे, जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र खोरखेडे, युवाशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष विराज कावडिया यांनी अभिनंदन केले आहे.