जळगाव- भाजपाचे ज्येष्ठ आणि मातब्बर नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपचे नाराज नेते एकनाथराव खडसे शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी कार्यालयात पत्रकार परिषद सुरु आहे.
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांनी ही घोषणा केल्यावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील यांनी एकनाथराव खडसे यांचे स्वागत केले आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील म्हणाले की, “त्यांच्या सारख्या चौफेर अभ्यासू नेत्याचा जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात आमच्या पक्षाला नक्कीच फायदा होईल असे सांगितले”.
यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, गफ्फार मलिक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत