चोपडा – येथे १जानेवारी २०२१ रोजी शौर्य दिवस बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द सभा चोपडा शहर व तालुका कार्यकारिणीच्या वतीने मोठ्या उत्सावात साजरा करण्यांत आला.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भिमान गृपचे संचालक सतिषभाई वाडे यांनी आज रोजी कोरोनाच्या प्रादुर्भावाने कोरेगाव भिमा येथे जावून विजयस्तंभाला मानवंदना देवू शकत नाही म्हणून चोपडा येथेच स्वखर्चाने विजयस्तंभाची प्रतिकृती उभारून दिली. डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जिल्हा संघटक हितेंद्र मोरे व तालुकाध्यक्ष बापूराव वाणे सर तसेच मान्यवराच्या हस्ते माल्यार्पण करण्यांत आले.यावेळी त्रिशरण, पंचशिल, बुध्दवंदना, भिमस्मृती सामुदायिक घेण्यांत आले. समता सैनिक दलाच्या वतीने बाबासाहेबांना व विजयस्तंभाला जनरल सलामी देण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला शहराध्यक्ष भरत शिरसाठ व मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यांत येवून समता सैनिक दलाने सलामी दिली. विजयस्तंभाला माजी सैनिक कमांडर एस.व्ही.करंदीकर यांनी व माजी सैनिक धनराज बाविस्कर यांच्या हस्ते वीर चक्र अर्पण करुन सलामी दिली. विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी आडगांव येथील समता सैनिकांनी माजी सैनिक करंदीकर व धनराज बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली परेड करुन उत्कृष्ट सलामी संचलन केले.
सदर कार्यक्रमास शहराध्यक्ष भरत शिरसाठ, तालुकाध्यक्ष बापूराव वाणे, जिल्हासंघटक हितेंद्र मोरे, नगरसेवक अशोक बाविस्कर, रमेश शिंदे, माजी सभापती गोपाळराव सोनवणे, उपाध्यक्ष छोटू वारडे, सेवानिवृत्त तहसीलदार युवराज मैलागिर,लखीचंद बाविस्कर, गोपाल गुरुजी, महेंद्र सोनवणे, सुदाम करनकाळ, अशोक शिरसाठ, सुदाम ईशी, ओंकार जाधव, संतोष अहिरे, समाधान सपकाळे, संजय अहिरे, भूरसिंग बाविस्कर, देविलाल बाविस्कर,नाना सांळुखे, उमेश नगराळे,पूर्णानंद वारडे, प्रताप बाविस्कर, गौतम बाविस्कर, संदिप सैदाणे, सिध्दार्थ शिरसाठ,आदी समाज बांधव व भारतीय बौध्द महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भरत शिरसाठ यांनी केले. प्रास्ताविक हितेंद्र मोरे यांनी केले. शेवटी आलेल्या मान्यवर, समाज बांधव यांचे व विजयस्तंभाची उभारणी भिमान गृपने केल्याने बापूराव वाणे यांनी आभार मानले.