धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या सात जागांपैकी दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहे. महाविकास आघाडीचे विजय पाटील आणि वैशाली पाटील या दोघांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
तालुक्यातील अहिरे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. गावातील वार्ड क्रमांक २ मधील महाविकास आघाडीचे दोन उमेदवार आज बिनविरोध निवडून आले आहे.
यात विजय शरद पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी तालुकाध्यक्ष) आणि वैशाली पवन पाटील (शिवसेना) यांची निवड आज बिनविरोध झाली आहे. निवड झालेल्या दोन्ही सदस्यांचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अभिनंदन होत आहे.