Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या तक्रारीबाबत बैठक

by Divya Jalgaon Team
January 4, 2021
in जळगाव, राजकीय
0
राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या तक्रारीबाबत बैठक

जळगाव प्रतिनिधी । महापालिकेत आरक्षण बदलाचा धाक दाखवून जमीनी लाटण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केल्यानंतर याबाबत आता १२ जानेवारी रोजी बैठक बोलावण्यात आली आहे.

अभिषेक पाटील यांनी शहराच्या विकास योजना आराखड्याच्या माध्यमातून आरक्षण बदलाची भिती दाखवून आर्थिक लुट सुरू असल्याची गंभीर तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. मनपाने सध्या विकास योजना आराखडा योजनेचे काम हाती घेतले असून झेनोलिथ सिस्टिम प्रा. लि. या कंपनी मार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. विकास योजना आरक्षणात ७० टक्के आरक्षण उच्च न्यायालयाने व्यपगत केले आहे; परंतु या आराखडा तयार करण्याच्या निमित्ताने माजी स्थायी समिती सभापतींकडून मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केला जात असल्याची तक्रार राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केली होती. आरक्षण बदलून टाकण्याचा धमकी देत आर्थिक देवाण-घेवाण सुरू असल्याचेही तक्रारीत म्हटले होते.

अभिषेक पाटील यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून या प्रकरणी १२ जानेवारी रोजी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत आता नेमके काय होणशार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share post
Tags: JalgaonMarathi NewsPoliticalराष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या तक्रारीबाबत बैठक
Previous Post

ग्रामपंचायत निवडणुकीत तृतीयपंथीस स्त्री राखीव प्रवर्गातून उमेदवारी

Next Post

जीवाची पर्वा न करता प्रवाशाचे प्राण वाचविणार्‍या लता बंडोलेंचा सत्कार

Next Post
जीवाची पर्वा न करता प्रवाशाचे प्राण वाचविणार्‍या लता बंडोलेंचा सत्कार

जीवाची पर्वा न करता प्रवाशाचे प्राण वाचविणार्‍या लता बंडोलेंचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group