Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पोलीस कॉलनीतील नागरिकांसाठी महापौरांनी केली टँकरची व्यवस्था!

१० दिवसापासून पाणी नसल्याची नागरिकांची तक्रार : महापौरांनी केल्या अधिकाऱ्यांना सूचना

by Divya Jalgaon Team
January 2, 2021
in जळगाव
0
पोलीस कॉलनीतील नागरिकांसाठी महापौरांनी केली टँकरची व्यवस्था!

जळगाव, – शहरातील सुप्रीम कॉलनीजवळ असलेल्या पोलीस कॉलनीत गेल्या १० दिवसापासून पाणी येत नसल्याची तक्रार नागरिकांनी महापौर सौ.भारती सोनवणे यांच्याकडे केली. महापौरांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत नागरिकांसाठी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करून दिली.

सुप्रीम कॉलनीतील भाग असलेल्या पोलीस कॉलनीत पाणी नेहमी कमी दाबाने आणि उशिराने येत असते. शहरातील सर्व भागातील पाणीपुरवठा बंद असताना पोलीस कॉलनी वसाहतीला पाणी देणे शक्य होते. शनिवारी महापौर सुप्रीम कॉलनीत पाण्याच्या टाकीची पाहणी करायला गेल्या असता परिसरातील महिलांनी महापौरांची भेट घेत गेल्या १० दिवसापासून पाणी येत नसल्याबाबत त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले.

महापौर सौ.भारती सोनवणे यांनी तात्काळ मनपाच्या अधिकाऱ्यांना बोलावून याबाबत सविस्तर माहिती घेतली. पोलीस कॉलनीला आज पाणीपुरवठा होणार होता परंतु उमाळा परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने टाकी पूर्ण क्षमतेने भरू शकली नाही परिणामी पाणीपुरवठा होऊ शकला नसून दोन दिवसांनी पाणी पुरवठा करता येईल असे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.

तात्काळ बोलाविले पाणी टँकर

नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत महापौरांनी त्यांना दिलासा देण्यासाठी मनपाच्या अग्निशमन विभागाला सूचना देत परिसरात टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केल्या. दिवसभरात शक्य होतील तेवढ्या फेऱ्या करून पाणी पुरविण्याच्या सूचना देत संबंधित नगरसेवकांना पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या.

Share post
Tags: पोलीस कॉलनीतील नागरिकांसाठी महापौरांनी केली टँकरची व्यवस्था!
Previous Post

जळगावातील गुरूनानक नगरात दोन गटात हाणामारी

Next Post

महिला शिक्षण दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा ३ जानेवारीला होणार गौरव

Next Post

महिला शिक्षण दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा ३ जानेवारीला होणार गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group