जामनेर, जळगाव- जामनेरमधील आनंदनगर भागातील रहिवासी असलेले रमेश चिंधू अपार (वय६०) यांच्या राहत्या घरी दि. ३१-०७-२०१३ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अज्ञात इसमाने प्रवेश करून अज्ञात कारणावरून , कोणत्यातरी हत्याराने कपाळावर मारून , दोरी सारख्या वस्तूच्या साहाय्याने त्यांचा गळा आवळून त्यांना जीवे ठार मारले.
म्हणून गुन्हा भा.दं.वि. कलम ३०२ , ४४९ प्रामाणे वगैरे फिर्यादिवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासात संशयावरून प्रकाश किशोर मोरे , सजित दत्तात्रय सैतवाल, विशाल निळकंठ पवार (रा. जामनेर) यांना अटक करण्यात आली होती.
सदरील खटला जळगांव जिल्हा न्यायालय येथे एस .जी . ठुबे यांच्या न्यायालयात चालला . सदरील खटल्यात आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आला नाही म्हणून न्यायालयाने आरोपीची आज निर्दोश मुक्तता केली आहे .
सदरील खटल्यात सरकार पक्षाकडून अॅड . पंढरीनाथ चौधरी यांनी कामकाज पाहिले . आणि आरोपीकडून अॅड . विजय दर्जी व अॅड . संदीप पाटील यांनी कामकाज पाहिले.