यावल ( रविंद्र आंढाळे) – तालुक्यातील सावखेडा सिम ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांना बेशिस्त वागणुकीमुळे निलंबीत तर किनगाव चे ग्रामविकास अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस यावलचे गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील यांनी दिल्याने पंचायत समितीच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे .
या संदर्भात यावल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ . निलेश पाटील यांनी या संदर्भात दिलेली माहीती अशी की यावल तालुक्यातील सावखेडा सिम ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मकरंद सैदाणे यांना वारंवार सूचना करून देखील बैठकी उपस्थित न राहणे दफ्तर तपासणी व बेशिस्त आणी शासकीय कामात दिरंगाई करणे अशा वागणुकीबद्दल निलंबीत करण्यात आले असुन , किनगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी कृष्णकांत सपकाळे यांना देखील याच कारणावरून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहीती दिली आहे .
गटविकास अधिकारी डॉ .निलेश पाटील यांनी केलेल्या कार्यवाहीमुळे पंचायत समितीच्या वर्तुळात सर्वत्र एकच खळबळ उडाली असुन गटविकास अधिकारी यांनी केलेल्या या कार्यवाहीचे स्वागत करण्यात येत असुन , तालुक्यात झालेल्या रोजगार हमी योजनेचे भ्रष्ठाचार , १४ व्या वित्तीय आयोगाच्या निधीत झालेले निकृष्ठ कामांचे गोंधळ व गोठ्यांच्या बोगस लाभार्थी प्रकरणी देखील अशाच प्रकारची निष्पक्ष कार्यवाही करावी अशी मागणी तालुक्यातुन करण्यात येत आहे .