जळगाव – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडली येथील उपक्रमशील शिक्षिका मोनिका विजय चौधरी यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे सन २०२०-२१ या वर्षाचा “नारीरत्न” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
राजनंदिनी संस्थेच्या अध्यक्षा संदीपा वाघ यांनी उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका मोनिका चौधरी यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देत पुरस्कार प्रदान केला.मोनिका चौधरी यांनी आतापर्यंत शिरसोली,नशिराबाद,राणीचे बांबरुड अशा विविध गावांतील शाळांमध्ये सेवा केली असून विद्यार्थ्यांसाठी ज्ञानरचनावादी अध्यापन,मूल्यवर्धन उपक्रम,टॅग उपक्रम असे अनेक विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.तसेच जिल्हा,तालुका स्तरावर अनेक शिक्षकांना प्रशिक्षणे दिली आहेत,नवोपक्रम,कृतीसंशोधन यांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. या उपक्रमांची दखल घेत “नारीरत्न” पुरस्कार प्रदान केल्याचे राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा संदीपा वाघ यांनी यावेळी सांगितले.मोनिका चौधरी यांना यापूर्वी देखील विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.पुरस्कार प्राप्तीबद्दल प्राथमिक शिक्षक,शिक्षिका,अधिकारी,पदाधिकाऱ्यांकडून खान्देश कुणबी मराठा वधुवर परिचय गृप व गौरी गृप वावडदा चे अध्यक्ष सुमित पाटील,ज्ञानेश्वर वाघ यांच्याकडून व सर्व स्तरातून शिक्षिका मोनिका चौधरी यांचे कौतुक होत आहे.