मेष : महत्वाची पत्रं, फोन येतील. परप्रांतातील भावंडांशी संपर्क साधाल. धडाडीने महत्वाचे निर्णय घ्याल. दिवसाची सुरुवात अतिशय आनंदात होईल. थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
वृषभ : संततीच्या प्रगतीच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल. आज आपल्या हातून उत्कृष्ट दर्जाचे लिखाण होईल. आपण घेतलेल्या निर्णयांची अमलबजावणी होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ होतील. कार्यक्षेत्रातील प्रशिक्षणाच्या निमित्ताने परदेशी संस्थांशी संबंध येतील.
मिथुन : आपण पूर्वी केलेल्या कामाची पोच मिळेल. सुग्रास भोजनाचा आस्वाद घ्याल. घरी पाहुणे येण्याची शक्यता. मोठय़ा व्यक्तींच्या मदतीने उद्योग, नोकरीत उत्कर्ष करणाऱ्या घटना घडतील. कार्यकौशल्याची प्रशंसा होईल.
कर्क : आपले मनोबल कमजोर होण्याची शक्यता. महत्वाचे पत्रव्यवहार होतील. आर्थिक उलाढाली टाळाव्यात. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सुसंधी लाभतील. महत्वाचे निर्णय घ्याल.
सिंह : आजचा दिवस नवीन व्यवसायाच्या शुभारंभासाठी अनुकूल. स्थिर मनाने महत्वाचे निर्णय घ्या. विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक प्रगतीचा दिवस. उष्णतेचे विकार, संसर्गजन्य विकार यांपासून त्रास होण्याची शक्यता. विरोधकांचा त्रास जाणवेल.
कन्या : नोकरीत बढती-बलदीचे योग संभवतात. कुटुंबातील व्यक्तिंसाठी वस्तूंची खरेदी करावी लागेल. अंदाज अचूक ठरतील. कार्यक्षेत्रातील महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मनाचा उत्साह कमी पडण्याची शक्यता.
तूळ : भाग्यकारक घटना घडतील. पूर्वी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल समाजात प्रतिष्ठा, मानसन्मान मिळेल. कामानिमित्त प्रवास करावे लागतील. आपल्या जोडीदाराच्या मतांचा पगडा राहील. आपल्या मतांचा आदर केला जाईल.
वृश्चिक : मनोबल उंचावणाऱ्या घटना घडतील. अचानक धनलाभाच्या दृष्टीने दिवस अनुकूल. मित्रपरिवाराचे सहकार्य लाभेल. काही कामे अपुरी राहतील. सट्टे अगर इतर धाडसाचे व्यापार करु नयेत. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये.
धनु : कामानिमित्त वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. पूर्वी मागितलेली एखादी सवलत आज मान्य होईल. आपले निर्णय ठाम ठेवा. नव्या ओळखी होतील व त्या फायदेशीर ठरतील. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. मित्र परिवाराची भेट होईल.
मकर : आपली कामं पूर्ण होताना विलंब लागेल. महत्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे. विरोधकांवर मात कराल. घराच्या सजावटीकडे लक्ष द्या. दुपारनंतर एखादी चांगली बातमी कळेल व घरातील वातावरण आनंददायी होईल.
कुंभ : शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल दिवस. नोकरीत उत्कर्षकारक घटना घडतील. लॉटरीचे तिकिट घेऊन पहा. एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनुकूल व्यक्तींशी संपर्क साधण्यात यश येईल.
मीन : कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस. कुटुंबासाठी काहीतरी विशेष खरेदी कराल. प्रतिष्ठित व्यक्तींचा सहवास लाभेल. भविष्यकाळाच्यादृष्टीने आर्थिक तजवीज करणे शक्य होईल. मोठी आर्थिक उलाढाल केली जाईल.