जळगाव प्रतिनिधी । सुप्रीम कॉलनी परिसरातील २४ वर्षीय विवाहितेचा ५० हजाराची छळ करण्यात आला. पतीसह मंडळींविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेचे नाव तरन्नुम मोहसिन देशमुख (वय-२४) रा. सुप्रिम कॉलनी यांचे मोहसीन नुरमोहम्मंद देशमुख यांच्याशी विवाह झाला आहे. पती मोहसीन यांना दुकान घेण्यासाठी पत्नीने माहेरहून ५० हजार रूपये आणावे यासाठी सकाळी व सायंकाळी दररोज शिवीगाळ करून शारिरीक व मानसिक छळ सुरू केला. याला सासु अफरोज नुर मोहंमद देशमुख आणि सासरे नुर मोहंमद सरदार मिया देशमुख पाठपुरावा देत राहिले.
पतीचा छळ असह्य झाल्याने पत्नी तरन्नुम देशमुख यांनी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सासू व सासरे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.