जळगाव प्रतिनिधी । यशस्वी उद्योजक/व्यावसायिक तथा दैनिक जनशक्तीचे संपादक कुंदन दत्तात्रय ढाके (वय४२) यांचे आज सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
उद्योजक कुंदन दत्तात्रय ढाके (वय ४२) हे पुणे येथील ख्यातनाम सिध्दीविनायक ग्रुपचे संचालक होते. ख्यातनाम रिअल इस्टेट डेव्हलपर म्हणून त्यांचा लौकीक होता. २०१४ साली दैनिक जनशक्तीच्या माध्यमातून त्यांनी मीडिया क्षेत्रात प्रवेश केला. आज जनशक्तीचा मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे. आज सकाळी ते पिंपरी-चिंचवड येथे मॉर्नींग वॉकला गेले असतांना चक्कर येऊन पडले. त्यांना रूग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषीत करण्यात आले.
कुंदन ढाके यांचे पार्थिव त्यांच्या भुसावळातील वेडिमाता मंदिराजवळच्या राहत्या घरी आणले जाणार आहे. भुसाळात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांना चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.दिव्य जळगाव टीमतर्फे कुंदन ढाके यांना आदरांजली.