नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज किसान सन्मान निधी अंतर्गत 9 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देणार आहेत. प्रधानमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी आज एका बटणाच्या मदतीनं एकाचवेळी 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपये जमा करणार आहे. इतकच नाही तर 6 राज्यातील शेतकऱ्यांसोबत आज संवाद साधणार आहेत.
PM-किसान आणि केंद्र सरकारच्या इतर कृषी कल्याणकारी योजनांबाबत शेतकऱ्यांचे अनुभव देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी समजून घेणार आहेत. त्यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. या योजनेंतर्गत दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात. एकीकडे दिल्लीमध्ये शेतकरी कृषी कायद्यातील नव्या धोरणांबाबत आंदोलन करत असताना हा कार्यक्रम होत आहे. उत्तर भारतातील शेतकऱ्यांकडून हा कायदा रद्द करण्याची मागणी एका बाजूला जोर लावून धरत असताना PM किसान योजनेअंतर्गत आज शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदर्भात गुरुवारी रात्री उशिरा माहिती दिली आहे. देशातील बळीराजासाठी उद्याचा दिवस खूप महत्त्वपूर्ण असेल. दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 9 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18 कोटी रुपयांची रक्कम म्हणजेच प्रत्येकी 2000 रुपये जमा होणार आहेत. या निमित्तानं शेतकरी बांधवांसोबत संवाद साधण्याची संधी मिळणार आहे असं पंतप्रधान मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
भाजपकडून आजचा दिवस मोठ्या उत्सवासारखा साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमात एक कोटी शेतकरी सहभागी होतील असं लक्ष्य ठेवलं आहे. आज भाजपचे नेते वेगवेगळ्या शेतकरी कार्यक्रमात सहभागी होतील. 19000 हून अधिक ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा कार्यक्रमक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह द्वारका इथे सेक्टर 15 मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
कल का दिन देश के अन्नदाताओं के लिए बेहद अहम है। दोपहर 12 बजे वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए 9 करोड़ से अधिक किसान परिवारों को पीएम-किसान की अगली किस्त जारी करने का सौभाग्य मिलेगा। इस अवसर पर कई राज्यों के किसान भाई-बहनों के साथ बातचीत भी करूंगा। #PMKisan https://t.co/MFVWDc63Xa
— Narendra Modi (@narendramodi) December 24, 2020