यावल (रविंद्र आढाळे ) – नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील हायमस्ट, पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासुन बंद असल्याने या प्रकारामुळे प्रभाग क्रमांक ३ मधील आयशानगर आणी खिरनीपुरा परिसरातील नागरीकांची मोठी गैरसोय होत या प्रश्नाकडे मुख्याधिकारी यांनी तातडीने लक्ष द्यावी अशी मागणी आयशानगरमधील काही समाजसेवी युवकांकडुन एका निवेदनाव्दारे करण्यात येत आहे .
दरम्यान या युवकांनी यावल नगर परिषदचे मुख्याधिकारी बबन तडवी यांना दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की , रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नातुन व निधीतुन यावल नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील आयशानगर मधील फातेमा मस्जिद जवळ तथा भुसावळ टी पांईट तसेच खिरनीपुरा बुरुज चौक या सार्वजनिक ठीकाणच्या परिसरातील देखील असलेले हाईम्सट पथदिव्य मागील ७ते ८ महीन्यांपासुन बंद अवस्थेत असुन या परिसरात राहणाऱ्या नागरीकांनी नगर परिषद कडे वारंवार तक्रार करून देखील उपयोग होत नसल्याने अखेर आज आयशानारमधील राहणारे समाजसेवी अश्पाक शाह हाजी गफ्फारशाह ,नजीब शेख , उमरे खान , शेख नदीम , राजीक रमीज पटेल , शेख सलीम टेलर , इमरान शेख पहेलवान यांच्यासह काही युवकांनी मुख्याधिकारी बबन तडवी यांना दिलेल्या तक्रार निवेदनाद्वारे केली आहे .