जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात ३३ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. तर ३५ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजच्या अहवालानुसार ९ तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे.
जळगाव ग्रामीण, पाचोरा, भडगाव, यावल, एरंडोल, रावेर, पारोळा, चाळीसगाव, मुक्ताईनगर तालुक्यातील कोरोना निरंक आढळून आले आहे. तर जळगाव शहर- २३, भुसावळ-१, अमळनेर-२, चोपडा-२, धरणगाव-१, जामनेर-२, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ३३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
आजच्या अहवालात नऊ तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे. तर आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान जिल्ह्यात एकुण ५५ हजार ४९१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैळी ५३ हजार ७८७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर ३८५ रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.