लोकांच्या कल्याणासाठी राजकीय पडद्यावरुन अनेक पात्रे लोकप्रिय होतात त्यातील काही आपल्या कर्तृत्वाने तर काही दुसऱ्याच्या सहवासात राहून लोकप्रिय होतात. राजकीय पात्रांमुळे खरंच विकास होतो का हा प्रश्न सर्वसामान्यपणे चर्चेला जातो. ज्यांना विकासात्मक ध्येय गाठायचे असते ते सामूहिक प्रयत्नही करतात. तर काही देखावा करतात. यामध्ये फक्त स्वतःचे फायदे पाहणारेही असतातच त्यांच्या मागे चेले,पंटर, यासह कार्यकर्ते म्हणवून घेणारेही असतातच. हे पंटर आपल्या स्वार्थासाठी आपआपल्या नेत्यांमध्ये दुफडी निर्माण करण्याचे कामही करतात.
म्हणतात ना मंथरा चांगल्या घरात आली तर त्या घरात दुही निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. राजकीय पडद्यावरील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजप पक्षात असे मंथराचे काम करणारे अनेक आहेत ही वस्तूस्थिती कुणीही नाकारु शकणार नाही. इतर पक्षातही आहेत बरं का? जळगाव जिल्हाचा विचार केला तर भाजपा ग्रामिण भागासह सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे प्रामाणिकपणे कोणी केले असेल तर ते लोकनेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पण दुर्दैवाने त्यांनाच पक्ष सोडावा लागला किंबहुना पक्ष सोडण्यास त्यांना मजबूर करण्यात आले असेच म्हणावे लागेल.
याला कारणीभूत त्यांनीच घडविलेले नेतृत्व असल्याचे बोलले जाते. याबाबत एकनाथराव खडसे यांनी वारंवार भाष्य केले आहेच. सुडाच्या राजकारणाचे बळी आपण पडल्याचे त्यांनी जाहिरपणे सांगितले आहेच. आता पुन्हा तोच कित्ता गिरविला जात असल्याचे बोलले जात आहे. ॲड. विजय पाटील, पारस ललवाणी यांनी केलेल्या गिरीष महाजन यांच्याविषयी कथीत आरोंपामुळे खळबळ उडाली आहे. गिरीष महाजन यांनीही काय ते सीडीपिडी दाखवूनच द्या असे सांगत सूडाचे राजकारण केले जात असल्याचे म्हटले आहेच. यावरून सोशल मिडीयामध्ये गिरीष महाजन चांगलेच ट्रोल होत आहेत.
निंभोराला गुन्हा दाखल झाल्यापासून अधिक प्रकरण चिघडत आहे. यावरून असे दिसते की, सत्ता मिळाली की आपल्यापेक्षा वरचढ वाटणाऱ्या ला संपविणे भलेही त्यासाठी खोटे गुन्हे दाखल करणे अधिकाऱ्यांना भाग पाडणे हे राजकरण जामनेर वाशियांचेच असेच आरोप होत आहे. गिरीष महाजननांनी सुडाच्या राजकारणाचे बीज आज त्यांनाच व्याजासह परतफेड मिळत आहे त्यामुळे कार्येकर्त्यांसह तेही सैरभर झाले आहेत. कदाचित ते विसरले असतील की, एकनाथराव खडसे सारखे ज्येष्ठ नेते खोट्या गुन्हांचे शिकार झाले तेव्हा आपल्याला सुडाचे राजकारण समजले नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सुडाच्या राजकारणाचे आपण समर्थनच केल्याच्या आपल्या मागील दशकाच्या वर्तनावरून समजते असे सोशल साईडवर विषय चर्चेली जात आहे. असो राजकारण हे राजकारण असते सुडाच्या राजकारणात अनेक बळी पडले त्यात सुरेशदादा जैन यांचेही नाव घ्यावेच लागेल असो. नेत्यांच्या अशा वागण्यामुळे मात्र जिल्ह्याचा विकास झाला नाही हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. सुडाचे राजकारण सोडा आणि विकासाचे राजकारण करा असेच वाटते पण ऐकून घ्यायला तयार कोण? बघु ज्या लोकांनी निवडून दिले आहे त्यांची तरी मनात भिती असावी.
नाजनीन शेख
संपादक, दिव्य जळगाव