मेष : आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल. संतसज्जनांचा सहवास लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. कर्तृत्त्वाला झळाळी येणाऱ्या घटना घडतील. सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान लाभेल.
वृषभ : अपेक्षित पत्रे येतील. नोकरीच्या मुलाखतीसाठी जाणार असाल तर यश निश्चित. आपले निर्णय योग्य ठरतील. आव्हान देण्याचा प्रयत्न होईल पण त्याकडे दुर्लक्ष करा. मन सैरभैर होईल.
मिथुन : महत्वाची कर्तव्ये पार पाडावी लागतील. पूर्वी केलेल्या कामाची नोकरीत वरिष्ठ प्रशंसा करतील. मिष्टान्न भोजनाचा योग आहे. जनसंपर्कातून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील. आत्मविश्वास व मनोबल उत्तम राहील. व्यवसायातील कामाचा वेग वाढेल.
कर्क : शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी वाटचाल होईल. परदेशातील नातेवाईकांशी संपर्क होईल. मनोबल उंचावणाऱ्या सुवार्ता समजतील. हितशत्रूंच्या कारवायांवर मोठय़ा युक्तीवादाने मात करता येईल. शेवटी विजय आपलाच होईल.
सिंह : वैवाहिक जीवनातील मतभेद टाळावेत. अचानक धनलाभाचा योग. छोटे प्रवास घडतील. संततीच्या प्रगतीमुळे आपली पत वाढेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती साधता येईल.
कन्या : व्यावसायिक जोडीदारावर आपल्या मनाचा चांगला प्रभाव पडेल. आपण घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी केली जाईल. आपले कार्यक्षेत्र वाढेल. गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल. आपल्या जवळच्या नातलगाला व्यवसायात सहभागी करुन घ्याल.
तूळ : नोकरीतील उत्कर्षाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा. अचानक धनलाभासाठी अनुकूल योग. घरगुती कामासाठी प्रवासयोग. समाजात लोकप्रियता वाढेल.
वृश्चिक : शैक्षणिक उत्कर्षाच्या दृष्टीने आज अनुकूल दिवस. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हाल. आज आपल्याला मानसिक स्थैर्य लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. खर्चाचे प्रमाण कमी होईल. नवीन परिचयातून लाभ होतील.
धनु : संतसज्जनांचा सहवास लाभेल. नोकरीत पूर्वी केलेल्या कामाची वरिष्ठ प्रशंसा करतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आपल्या वक्तृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल.
मकर : आज आपल्या कुटुंबियाबरोबर आपले प्रवासयोग घडण्याची शक्यता आहे. अनपेक्षित गाठी भेटी होतील. आपले अंदाज अचूक येतील. कामाच्या पद्धतीत केलेला थोडासा बदल सुखावह वाटेल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल.
कुंभ : अर्थिक उत्कर्षाच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल. आपल्या लहरी वागण्यावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक मतभेद टाळा. नवीन व्यवसायासाठी भांडवल उभे कराल. व्यावसायिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल.
मीन : ठरविलेली कामं विलंबाने पार पडतील. नोकरीतील कामामुळे दगदग जाणवेल. आरोग्याच्या तक्रारी राहतील. नव्या उमेदीने कामाला लागाल. व्यवसाय उद्योगातून कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा.