जळगाव – विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशीनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्य ऑनलाइन क्षेत्रभेट संपन्न झाली कोरोना मुळे जरी शाळा बंद असले तरी शिक्षण व इतर शैक्षणिक कार्यक्रम मात्र सुरू आहेत दर वर्षा प्रमाणे शाळेने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धतिने क्षेत्रभेट घडवून आणली प्रत्येक वर्गानुसार वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्रभेट देण्यात आली.
त्यामध्ये इयत्ता पहिली धार्मिक स्थळे मंदिर ,मज्जीद, गुरुद्वारा, चर्च .यांचा समावेश होता इयत्ता 2री साठी कुंभारवाडा येथे देण्यात आली इयत्ता तिसरी साठी औद्योगिक वसाहत जेली फॅक्टरी येथे संपन्न झाले इयत्ता चौथी क्षेत्रभेट व वाचनालय येथे तर इयत्ता पाचवीची क्षेत्रभेट पोस्ट ऑफिस येथे संपन्न झाली.
क्षेत्रभेटीसाठी शाळेतील शिक्षक समाधान पाटील, रवींद्र भोईटे ,अरुण पाटील, नरेंद्र भोई ,धीरज जावडे, प्रदीप पाटील, अनिल कोथळकर ,संतोष शिरसाळे, स्वानंद देशमुख गणेश देसले, दिग्विजय पाटील, निलेश बडगुजर अमर जंगले .यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्या जागेची माहिती ऑनलाईन झूम ॲप द्वारे मुलांना सांगितली या क्षेत्रभेटीसाठी शाळेचे प्राचार्य अमितसिंह भाटीया शाळेच्या समन्वयिका स्वाती अहिरराव यांचे मार्गदर्शन लाभले