यावल (रविंद्र आढाळे) – तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असुन , शासकीय यंत्रणा सज्ज झाली असुन , निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाल्यापासुन निवडणुक लढविण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जोळणीसाठी तहसील कार्यालयात नागरीकांनी एकच गर्दी केली असल्याने तहसील कार्यालयास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे .
यावल तालुक्यातील या निवडणुकीसाठी नेमणुक करण्यात आलेल्या निवडणुकी निर्णय अधिकारी यांची एक निवडणुक प्रक्रिया संदर्भातील महत्वपुर्ण बैठक आज यावल येथे पार पडली.
यावल तालुक्यातील डांभुर्णी , पिळोदे खुर्द , किनगाव बु॥ ,मारूळ , भालशिव , अंजाळे गृप , बामणोद , सांगवी खुर्द , निमगाव गृप , भालोद , राजोरे , हिंगोणा ,नावरे , दहिगाव , वढोदे प्रगणे यावल , डोणगाव , आडगाव , मोहराळे , कोसगाव , बोरावल बु॥, अट्रावल ,वनोली , आमोदे , बोरखेडा बु॥ , सांगवी बु॥ , पिंपरूड , उंटावद , पिंप्री , विरावली , बोरावल खु॥ , नायगाव , सावखेडासिम , टाकरखेडा , कोळवद , वढोदे प्रगणे सावदा ,सातोद , वड्री खुर्द , हंबर्डी ,मनवेल ,कोरपावली ,महेलखेडी , कासवे गृप , दुसखेडा , डोंगर कठोरा ,विरोदे , चिंचोली , शिरसाड अशी एकुण ४७ग्रामपंचायतच्या सार्वत्रीक पंचवार्षीक निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाले असुन , दिनांक २३ डिसेंबरपासुन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असुन १ ५ जानेवारीला २१७ मतदान केन्द्रांवर ४६९ भावी ग्रामपंचायतीच्या कारभारींच्या निवडीसाठी मतदान होणार असुन दिनांक १८ जानेवारी रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे .
आज यावल येथील तहसील कार्यालयात तहसीदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार आर .के. पवार , नायब तहसीलदार आर डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व निवडणुक निर्णय अधिकारी यांची निवडणुक प्रकीये संदर्भात प्रशिक्षण व प्रात्यक्षीक मार्गदर्शन संदर्भातील सविस्तर माहीती उपस्थित सर्व अधिकारी वर्गास अवगत करण्यात आली.