जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील हिंदू-मुस्लिम एकता बिल्डींग पेंटर युनियनची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली आहे. यात शहर सचिवपदी अकील खान मन्सूर खान यांची तर सहसचिवपदी सुभाष तुळशीराम भोई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील हिंदू-मुस्लिम एकता बिल्डींग पेंटर युनियनची कार्यकारिणी नुकतीच एकमताचे जाहीर करण्यात आले. या कार्यक्रमास पेंटर दगडू, जितेंद्र सहानी, अकिलबाब, करण पेंन्टर, शरीफ पठाण, आमीर मिरची, आसीफ पेन्टर, अकिल बाबा पेंटर, मंगल पेंटर, बाळासाहेब पेंटर, महेश जाधव, सुर्यदर्शन सहानी, सचिन सोनार, स्वामी पेन्टर, इरफान पेन्टर, गुफुर पेन्टर, सुभान पेन्टर, शमीर पेन्टर, फारूख पेन्टर, अहमद खान पेन्टर, खलील शाह पेन्टर, भिकन पेन्टर यांच्यासह आदी उपस्थित होते.
यावेळी अकिल मन्सूर खान यांची सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.