जळगाव प्रतिनिधी । शहरात मातोश्री आय सी यू अँड ट्रामा सेंटर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा जळगावात शुभारंभ करण्यात आला आहे. आ. राजुमामा भोळे, माजी आमदार मनीष जैन, नगरसेवक डॉ. विरेन सुरेश खडके यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री आयसीयू अँड ट्रामा सेंटर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे.
जळगाव शहराचे आमदार राजु मामा भोळे, माजी आमदार मनीष जैन आणि नगरसेवक डॉ. विरेन सुरेश खडके यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री आयसीयू अँड ट्रामा सेंटर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. याच्या उदघाटनाला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी मंत्री आ. गिरीश महाजन, खासदार उन्मेश पाटील, माजी खासदार ईश्वरलाल जैन, जैन समूहाचे अध्यक्ष अशोक जैन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
भाजप जळगाव जिल्हाध्यक्ष तथा आ. राजू मामा भोळे, माजी पालक मंत्री आमदार संजय सावकारे, माजी आमदार मनीष जैन, आमदार चंदूभाई पटेल, महापौरभारतीताई सोनवणे, उपमहापौर सुनिल खडके,यांच्यासह जिल्ह्यातील आजी माजी आमदार, महापौर, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीचे सदस्य, आजी माजी नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संघटना संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.