मुंबई – कोरोनाच्या संकट काळात सोन्यात गुंतवणूक (Gold Investment)करण्यास गुंतवणूकदारांनी प्राधान्य दिले. त्यामुळे मधल्या काळात सोन्याचे भाव कडाडले. पण कोरोना लसीची बातमी येताच गुंतवणूकदारांनी कोरोनाच्या गुंतवणुकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे सोन्याचे भाव पुन्हा एकदा घसरले. कोल्हापुरात सोन्याचे भाव 51,100 प्रतितोळा असून, चांदीचे दर 67,500 प्रतिकिलो झालेत. तर जळगावात सोन्याचा भाव 51,763 प्रतितोळा असून, चांदी 69,607 प्रति किलोवर पोहोचली आहे.
विशेष म्हणजे गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 14 डिसेंबरला भारतात सोने-चांदीचे भाव चांगलेच घसरले होते. दिल्ली सराफ बाजारात सोन्याचे भाव 460 रुपयांनी घसरले होते. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याची किंमत 48 हजार 371 रुपयांवर पोहोचली होती. याआधी सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 48 हजार 831 रुपयांपर्यंत घसरला होता. सोन्यापाठोपाठ चांदीचाही दर घसरल्याचं पाहायला मिळालं. 629 हा दर रुपयांनी घसरला होता. त्यामुळे सराफ बाजारात चांदीचा दर 62 हजार 469 प्रति किलोवर येऊन पोहोचला होता, तर त्याआधी हा दर 63 हजार 98 रुपये प्रतिकिलो इतका होता.
पुण्यातील सोन्याचा दर प्रतितोळा 51 हजार 500 रुपये होता
पुढच्या दिवशीही अशाच प्रकारे सोन्याचे भाव पाहायला मिळाले होते. यानंतर बुधवारी म्हणजेच 16 डिसेंबरला पुन्हा सोने-चांदीला झळाळी आली होती. गुरुवारी म्हणजे 17 डिसेंबरला जळगावपेक्षा पुण्यात सोन्याचे दर अधिक असल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील सोन्याचा दर प्रतितोळा 51 हजार 500 रुपये होता. तर जळगावात सोने प्रतितोळा 51 हजार 37 रुपये होता. कोल्हापूरचा विचार केला तर सोन्याचा भाव 51 हजार 100 रुपये प्रतितोळा इतका होता.
या दिवशी पुण्यापेक्षा जळगावात चांदी खरेदी करणं स्वत: ठरलं. कारण पुण्यात चांदीची किंमत प्रतिकिलो 65 हजार रुपये इतकी होती. तर जळगावात चांदीला 67 हजार 506 रुपये प्रतिकिलो इतका दर होता. तिकडे कोल्हापुरात चांदी 64 हजार रुपये प्रति किलो दर होता. गुरुवारी 18 डिसेंबरला मात्र सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रातील वायदा बाजारात गुरुवारी सोने 50 हजारांच्या पार गेलं होतं, तर चांदीच्या किमतींनी 67 हजार 500 रुपयांचा टप्पा पार केला होता. गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याच्या किमतीत चढउतार होताना दिसत आहेत. अमेरिकेत मिळालेल्या मदतीच्या पॅकेजमुळे सोन्याच्या किमतीत उसळी आल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.